Advertisements

IPO म्हणजे काय? यात गुंतवणूक कशी करावी? IPO संपूर्ण माहिती मराठी 2022

5/5 - (8 votes)

आयपीओ म्हणजे काय | IPO Full Form In Marathi | शेअर बाजारात IPO म्हणजे काय | IPO Meaning in Marathi

मित्रांनो जर आपणांस शेअर मार्केट बद्दल माहिती असेल तर आपण IPO हे वाक्य कधी न कधी नक्की ऐकलं असेल आणि आपल्या मनात IPO काय आहे? हा प्रश्न नक्की आला असेल.

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आम्ही आपल्या प्रश्नांचे उत्तर घेऊन आलो आहोत. या लेखात आपन IPO म्हणजे काय? IPO काय असते आणि यात आपण गुंतवणूक कशी करावी? या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

IPO म्हणजे काय | What Is IPO In Marathi

IPO विषयी जाणून घेण्या आधी आपल्याला शेअर मार्केट काय आहे आणि तो कसा कार्य करतो हे जाणून घेणे आवश्यक आहे.

यासाठी आपण आमची ही पोस्ट वाचु शकता: शेअर मार्केट काय आहे?

IPO चा Full Form Initial Public Offering होतो, यालाच मराठीत प्राथमिक खुला देकार असे म्हणतात.

IPO द्वारे एक Private कंपनी Public होते. याचा अर्थ IPO द्वारे सामान्य गुंतवणूकदार एखाद्या कंपनीचे Share ची खरेदी करून त्या कंपनीत आपली हिस्सेदारी नेमतो.

IPO ही अशी प्रक्रिया आहे जिथे सामान्य गुंतवणूकदार पहिल्यांदा शेअर खरेदी करुण एखाद्या कंपनी मध्ये भागीदार होतो म्हणजे जर ती कंपनी भविष्यात फायदा कमवेल तर गुंतवणूकदाराचा पण फायदा होईल अन्यथा जर ती कंपनी घाटयात गेली तर गुंतवणूकदर सुधा घाट्यात जाईल.

IPO मधुन पहिल्यांदा कंपनी ही स्टॉक एक्सचेंज वर List होते ज्यामुडे अन्य सामान्य गुंतवणूकदार त्या कंपनीचे शेअरची खरेदी-विक्री करू शकतात.

Business/Startup Funding Stages In Marathi

जेव्हा एखाद्या कंपनीची नवी सुरुवात असते तेव्हा ती कंपनी चार प्रकारची फंडिंग घेते.

i. कोणताही व्यवसाय हा एका विचाराने शुरू होतो व त्या कल्पनेला मूर्त रूप देण्यास तो व्यक्ति बिजनेस शुरू करतो त्याला आपण Founder असे म्हणतो.

ii. त्या व्यवसायाला शुरू करण्यासाठी व्यक्ति आपली Saving लावतो अन्यथा आपली Family/Friends कडून पैसा गोडा करतो. Saving/Family/Friends ही पहिली Funding असते.

iii. व्यवसायाला वाढवण्यासाठी थोडे जास्त प्रमाणात पैशाची गरज असते तेव्हा Angel Investors असतात जी व्यवसायाला Funding देतात आणि बदल्यात काही प्रमाणात भागीदारी (Stake) घेतात.

iv. Angel Investors नंतर Venture Capitalist असतात जे एखाद्या Startup/Business मध्ये करोडोंची गुंतवणूक करतात. बदल्यात त्यांना त्या व्यवसायात काही प्रमाणात भागीदारी घेतात.

v. Venture Capitalist नंतर जेव्हा कंपनीला खुप मोठी वाढ करायची असते, विदेशा मध्ये आपले व्यवसाय पोहोचवायचे असते तेव्हा कंपनीला करोडो/अरबो रुपयाची गरज पडते तेव्हा एखादी कंपनी आपला IPO काढत असते. आणि ही आखरी पडाव जितून Angel Investors/Venture Capitalist आपल्या गुंतवणूकीवर अरबो रूपयाची नफा कमावतात.

IPO आनण्या मागे कंपनीचे उद्दीष्ठ

सामान्य गुंतवणूकदाराला कंपनी हिस्सेदारी का देते? IPO आणण्यामागे कंपनीचे काय कारण असतो?

i. कंपनी आपल्या विकासासाठी आणि पैसे गोडा करण्यासाठी IPO आणत असते.

ii. स्थापित कंपन्या आपल्याला करोबाराला पुढे नेन्यासाठी IPO आणत असते.

iii. काही कंपन्या आपल्या व्यवसायाचा खर्च काढण्याकरिता IPO आणत असते.

iv. एक व्यवसाय आहे जो चांगला चालत आहे आणि त्याला आता आपली वाढ करायची आहे. तर अश्या मध्ये तो व्यवसाय बैंक कडुन Loan घेऊ शकतो पण Loan वर व्याज सुधा द्यावा लागतो.

पण कधी-कधी बैंक व्यवसायाला करोडो-अरबो रुपयाची फंडिंग करण्यास असमर्थ ठरतात. तर यात व्यवसायाकड़े दूसरा पर्याय असतो तो आहे IPO.

IPO च्या माध्यमातुन कंपनी जनते कडून करोडो-अरबो रुपयाची Funding घेते, यात कंपनीला कसल्या ही प्रकरचा व्याज कुणालाही द्यावा लागत नाही आणि बदल्यात कंपनी आपल्या व्यवसायात गुंतवणूकदाराला हिस्सेदारी देते.

आय.पी.ओ. मध्ये कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार गुंतवणूक करतात?

जेव्हा कंपनी आपला IPO लाँच करते तेव्हा गुंतवणूकदाराचे कई प्रकार असू शकतात.

जसे,
i. Retail Individual Investor (RII)
ii. Non-Institutional Investor (NII)
iii. Qualified Institutional Investor (QII)
iv. Anchor Investor

i. Retail Individual Investor (RII)

ही गुंतवणूकदाराची सर्वात Common Category आहेत यात Resident Indian Individuals, Non-Resident Indian, Hindu Undivided Families समाविष्ठ असतात.

या कैटेगेरीतिल गुंतवणूकदार 2 लाखां पर्यंतची गुंतवणूक करू शकतात. आणि IPO मध्ये 35% Reserve असते.

ii. Non-Institutional Investor (NII)

जे Investor आय.पी.ओ. मध्ये 2 लाखांपेक्षा अधिकची गुंतवणूक करतात त्यांना NII Category मध्ये ठेवल्या जाते. या गुंतवणूकदाराला IPO मध्ये 15% ची Reserve असते.

iii. Qualified Institutional Investor (QII)

QII Category मध्ये Mutual Fund, Public Financial Institution, Foreign Portfolio Investor, Commercial Bank येतात. या कटेगरीतील गुंतवणूकदारासाठी IPO मधील 50% Size हा Reserve असते.

iv. Anchor Investor

Anchor Investor असे गुंतवणूकदार असतात जी IPO मध्ये ₹10 करोड पेक्षा अधिकची गुंतवणूक करतात. या कैटेगरीतिल गुंतवणूकदाराला IPO मध्ये 60% दिला जातो.

आय.पी.ओ. मध्ये गुंतवणूक कशी करावी | How To Invest In IPO In Marathi

आय.पी.ओ. आणण्यासाठी कंपनीला SEBI (Securities and Exchange Board of India) ची नियम पूर्ण करावा लागतो. तेव्हा एखादी कंपनी आपला IPO जाहिर करू शकते.

IPO कोणत्याही असला तरी तो 3 ते 10 दिवसच खुला राहते. म्हणजे कंपनीच्या IPO मधे आपण 3 ते 10 दिवसाच्या कालावधित गुंतवणूक करू शकतो.

IPO मध्ये त्या कंपनीच्या वेबसाइट वर किंवा ब्रोकरच्या माध्यमातून आपण IPO मधे गुंतवणूक करू शकतो.

जेव्हा आपण IPO घेत असतो तेव्हा आपण सीधा कंपनी कडून शेअरची खरेदी करत असतो याला Primary Market असे म्हणतात.

IPO नंतर ती कंपनी आपले शेअर Stock Exchange वर लिस्ट करते. Stock Exchange वर कंपनी लिस्ट झाल्या नंतर तिच्या शेअर ची खरेदी विक्री आपण शेअर मार्केट मध्ये करत असतो. Share Market हा Secondary Market असतो.

IPO मधुन पैसे कसे कमवायचे | How To Make Money From IPO In Marathi

IPO मधुन पैसे कमवायचे दोन पद्धती आहे.

i. Listing Gain
ii. Long Profit Gain

i. Listing Gain

Listing Gain म्हणजे ज्या किमतीवर कंपनीचा IPO Exchange वर लिस्ट होते त्या कालावधि पर्यंत तुम्ही IPO ला होल्ड करता.

जर तुम्ही एखादा IPO ₹10,000 Lot नुसार खरेदी करता आणि जेव्हा हा IPO Stock Exchange वर लिस्ट होते त्या वेडेस त्याची कीमत 10%, 20%, किंवा कधी-कधी 100% वाढतो तेव्हा तुम्ही त्या IPO मध्ये आपली Porfit Book करुण पैसे कमाऊ शकता.

ii. Long Profit Gain

जर तुम्ही एखाद्या कंपनीचा IPO मध्ये गुंतवणूक करता आणि तुम्हाला वाटते की ही कंपनी भविष्यात Growth करेल आणि Profit कमावेल तर अश्या प्रकारच्या कंपनीत तुम्ही Logn Term साठी Stock Holding करून भविष्यात पैसे कमाऊ शकता.

(FAQ’s)

 1. IPO मध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे का?

  कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्याला त्याच्या बद्दल संपूर्ण माहिती असने आवश्यक असते. हा नियम IPO मध्ये सुधा लागु होतो.

  IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्याला त्या कंपनी बद्दल संपूर्ण माहिती असने आवश्यक आहे तरच आपण त्या कंपनीत गुंतवणूक करावी.

 2. काय IPO आपल्याला लखपति बनवतो?

  IPO मध्ये शेअर हे Lot मधे पुरविल्या जाते आणि गुंतवणूकदार फक्त एकच Lot घेऊ शकतो ज्याची कीमत ₹10,000-₹15,000 रुपया पर्यंत असते.

  जर गुंतवणूकदार नशीबवान असला आणि Listing च्या वेडेस त्या IPO ची कीमत 10%, 20%, 100% जर वाढत असेल तर गुंतवणूकदार आपल्या गुंतवणूकी वर फक्त Double पैसे अर्थात ₹10,000 वर ₹20,000 चा नफा.

  IPO मध्ये आपल्या गुंतवणूकीची कीमत वाढतो पण हा लखपति बनण्याच मार्ग नाही.

(Conclusion)

कोनत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनी आणि त्या कंपनीचे प्रोमोटर चा बैकग्राउंड नक्की तपासा. त्या कंपनी चा मागिल Performance तपासुन घ्या आणि बघा त्या कंपनीचे आतापर्यंत चे Growth काय आहे. नेहमी या गोस्टिना लक्षात ठेउनच IPO मध्ये गुंतवणूक करा.

आशा आहे आमचा आज चा लेख IPO काय आहे? तुम्हाला पसंद आला असेल. या लेखात IPO काय असतो आणि यात गुंतवणूक कशी करावी बघितलो.

अन्य व्यक्तिना IPO बद्दल कडविन्यास आपन या लेखाला तुमच्या मित्रांमधे, परिवारामध्ये, सोशल मीडिया वर शेअर करू शकता. आपणांस या प्रकारचे महत्वपूर्ण माहिती भाविष्यात मिडत राहिल असी आमची खात्री आहे.

आपण आपला महत्वपूर्ण वेळ आमच्या लेख वचन्यास दिला या बद्दल आमची Team आपला धन्यवाद करीत आहे.

Comment करा पुढिल लेख तुम्हाला कोणत्या विषयावर हवं आहे.

हे ही वाचा:

1. Mutual Fund म्हणजे काय?

2. शेअर मार्केट काय आहे

3. शेअर मार्केट मधे गुंतवणूक कसी करावी.

4. Fundamental Analysis कसे करायचे?

Leave a Comment

%d bloggers like this: