Advertisements

शेअर मार्केट म्हणजे काय | Share Market Information in Marathi

5/5 - (7 votes)

शेअर बाजार म्हणजे नक्की काय असते? शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? शेअर बाजारातून पैसे कसे कमवायचे? हे सर्व प्रश्न तुमच्या मनात येत असतील तर आजची पोस्ट खास तुमच्यासाठीच आहे.

“शेअर मार्केट म्हणजे असे ठिकाण जिथे कंपनीच्या शेअरची खरेदी-विक्री होते”

मित्रांनो मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा हे आहेत आणि यांना पूर्ण करण्यासाठी मनुष्य आपला जीव की प्राण एक करतो म्हणजे तो आपला संपूर्ण आयुष्य पैसे कमावन्यात व्यर्थ करतो.

माझा म्हणन्याचा तात्पर्य असा की जर तुम्ही आपला पुर्ण जीवन फक्त मूलभूत गरजा भागवन्यासाठी घलवात असाल तर तुमचे स्वप्न अपूर्ण राहतील.

जर तुम्ही बघाल तर, आजच्या जगात लोकांकड़े पैसे कमावन्यसाठी बरेच मार्ग आहेत (नौकरी, व्यवसाय) पण जर तुम्हाला तुमचे स्वप्न साकार करायचे असतील, पैसे कमावन्याचा दूसरा साधन हवे असेल तर तुम्हाला स्टॉक मार्केट बद्दल माहिती असने आवश्यक आहे.

एक इंग्लिश सुविचार आहे “If you don’t find a way to make money while you sleep, you will work until you die”

Warren Buffet

म्हणजे “जर तुम्ही झोपेत असतानासुद्धा तुम्ही पैसे कमवत नसाल तर तुम्हाला मरेपर्यंत काम करावा लागेल”

Table of Contents

आपण शेअर मार्केट का शिकले पाहिजे | Why Should You Learn The Stock Market

 • शेअर बाजार तुम्हाला तुमच्या नौकरी अथवा व्यवसाया सोबत दूसरा उत्पन्नाचा स्त्रोत आहे.
 • शेअर मार्केटमधे तुमच्या पैस्यांची वाढ होते.
 • तुमच्या पैश्यांवर इतर बँकांपेक्षा जास्त परतफेड (Return) मिडतो.
 • स्टॉक मार्केट तुम्हाला श्रीमंत बनन्यासाठी मदत करतो.

शेअर मार्केट विषयी माहिती जाणून घेण्या आधी आपण जाणुया की शेअर काय असते? जो की Share Market Basics आहे.

शेअर म्हणजे काय | What Is Share In Marathi

शेअर (Share) ज्याचा मराठी अर्थ होतो हिस्सा, भाग. शेअरला आपन ‘स्टॉक’ असे पन म्हणतो.

शेअर मार्केट मध्ये याला आपन एखाद्या कंपनीचा सहभागी वाटा म्हणू सकतो. जेव्हा एखाद्या कंपनीला Growth करायची असते त्यासाठी कंपनीला खुप मोठ्या प्रमाणात रकमेची गरज असते, ही रकम इतकी मोठी असते की साधारण बैंका एवढे पैसे व्याजावर देऊ नाही शकत म्हणून कंपनीचे मालक आपल्या बिजनेस मधला काही भाग (Share) हे लोकांना देतात आणि त्याच्या बदल्यात ते पैसे गोडा करतात.

तुमच्या कड़े ज्या कंपनीचे आणि जितके प्रमाणात शेअर असतील तुम्ही त्या कंपनीचे तितके प्रमाणात मालक असता.

Stake in Percentage in company

उदा. जर समझा तुमच्याकड़े Reliance कंपनीचे 20% टक्के Share आहेत तर तुम्ही Reliance Company चे 20% चे मालक आहात. आणि जर तुमच्याकड़े 50% टक्के शेअर असतील तर 50% टक्के मालक असाल.

एखादया कंपनीचा शेअर विकत घेणे म्हणजे त्या कंपनीत आपली भागीदारी नेमने. जर भविष्यात कंपनी नफा कमवेल तर आपला पण नफा होईल जर कंपनीचा तोटा (Loss) होईल तर त्या Loss मधे आपली सुद्धा भागीदारी राहिल.

शेअर मार्केट म्हणजे काय | What Is Share Market In Marathi

आपण कधी बाजारात सामानाची खरेदी-विक्री केला असाल तर शेअर मार्केट समजनं अगदी सोप आहे.

तुम्हाला शेअर म्हणजे काय हे समजलं, मार्केट म्हणजे जिथे आपना एखाद्या वस्तु ची खरेदी-विक्री करतो असे ठिकाण. बस शेअर मार्केट म्हणजे जिथे कंपनीच्या शेअरची खरेदी-विक्री केल्या जाते असे ठिकाण.

भारतात स्टॉक्स ची खरेदी-विक्री साठी मुंबई मधले बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombey Stock Exchange) आणि दिल्ली मधले नेशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange) आहेत.

या स्टॉक एक्सचेंज मधे जीतके कंपनी लिस्टेड असतील त्या कंपनीमधे तुम्ही आपले पैसे गुंतवु शकता. ज्या प्रकारे तुम्ही शेअर बाजार मधे पैसे बनवु शकता त्याच प्रकारे तुम्ही इथे पैसे गमाउ पण शकता.

खुप से लोक या मार्केट मधे पैसे कमावन्यासाठी येतात पण 95% लोक इथे आपले संपूर्ण पैसे गमाऊन बसतात आणि फक्त 5% असे व्यक्ती असतात जे इथून पैसे कमावतात.

याचा कारण एकच आहे शेअर मार्केटची माहिती. खुपसे लोकांना माहितच नसते की स्टॉक मार्केटमधे इंवेस्टमेंट कसा करायचा, शेअर बाजारातून पैसे कसे कमावतात आणि ते लोक याला सट्टा बाज़ार म्हणुन आपले नशीब आजमावन्यासाठी येतात आणि आपले पैसे गमावतात.

पण जे व्यक्ती स्टॉक मार्केट मधे पैसे कमावतात ते याला जुगारी बाजार नाही तर Investment Opportunity समजतात. पैसे गुंतवण्याआधी मार्केट रिसर्च करतात, कंपनीची संपूर्ण माहिती करुण घेतात, नंतर आपले पैसे Long Term Investment म्हणुन गुंतवतात आणि पैसे कमावतात.

जी व्यक्ती इथे पैसे बनवु शकत नाही आणि जे व्यक्ती इथुन पैसे कमावतात यांचा मधला फरक म्हणजे त्यांची Knowledge, गुंतवणूक करण्या आधीची माहिती.

तुम्हाला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याआधी काही नियमाचा पालन करण्याची आवश्यकता असते. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी या विषयीची माहिती असने आवश्यक आहे.

शेअर कसा खरेदी करायचा | How To Buy Share In Marathi

शेअर खरेदी करण्यासाठी तुमच्याकड़े डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट असने गरजेच आहे.

ट्रेडिंग अकाउंट द्वारे आपण शेअर्सची खरेदी-विक्री करु शकतो आणि Demat Account एक प्रकारे डिजिटल वालेट असते जिथे आपले खरेदल्या जातात.

NSDL आणि CDSL यात आपले खरेदी केलेले शेअर ठेवल्या जातात.

डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट हे आपण बैंकातर्फे किवा ब्रोकर कडून Open करु शकतो. पण बैंकातर्फे Open केलेल्या अकाउंट मधे जास्त Brokarge शुल्क द्यावा लागतो म्हणून कधी ही डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ब्रोकर कडून उघडून घ्यावे.

भरतात असे तुम्हाला खुप ब्रोकर मिडतील पण Upstox असे ब्रोकर आहेत ज्यात श्री. रतन टाटांनी स्वत: फंडिंग केली आहे.

Upstox तुम्हाला Free मध्ये डिमॅट आणि ट्रेडिंग खाता उघडण्याची परवानगी देते.

एकदा तुम्ही डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन केला तर तुम्ही शेअरची खरेदी-विक्री करू शकता.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी | How To Invest In Stocks Market

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूकिसाठी आपल्याला काही बाबी लक्षात ठेवने आवश्यक आहे.

Be Humble: जेव्हा तुम्ही तुमचा पाहिला स्टॉक खरेदी करता तेव्हा दोन गोष्टी घडू शकतात एक तर तुम्हाला होईल तर दूसरा तुम्हाला प्रॉफिट होईल. जेव्हा Bychance लोकांना स्टॉक मार्केट मध्ये नफा झाला तर ते स्वतःला स्टॉक मार्केट जीनियस समझतात आणि जास्त रिस्क घेतात. पण याच कारणामुडे खुप से लोक आपला पैसा गमाउन बसतात.

जर तुम्हाला स्टॉक मार्केट मध्ये प्रॉफिट झाला असेल तरी पण सिखन्यावर फोकस करा.

Focus On Learning: जर एखाद्याला अगोदर शेअर मार्केट मध्ये Loss झाला तर ते धारना बनवतात की स्टॉक मार्केट जुआ आहे, गैंबलिंग आहे आणि नेहमी साठी स्टॉक मार्केट मधुन दूर होतात.

पण तुम्हाला जर शेअर मार्केट मध्ये नुकसान झाला तर त्या नुकसानाचा कारण शोधून काडा आणि आपल्या लर्निंग वाढवन्यावर लक्ष्य द्या.

शेअर मार्केट मधून पैसे कसे कमवायचे | How To Earn Money From Stock Market

स्टॉक मार्केट मधे पैसे बनवने जितक सोपं दिसते तितक आहे नाही. जे लोक शेअर बाजारात गुंतवणूक करतात आणि त्यातून फक्त थोडेच लोक असे असतात जे पैसा बनवतात.

याचा कारण काय?

बघा, भारतात शेअर बाजाराला सट्टा, जुगार आणि जोखीम असे म्हटले जाते पण असं काहीच नाही आहे. जर एखादा व्यक्ती अश्या कंपनी मधे आपले पैसे लावत असेल ज्या बद्दल त्याला काहीच जानिव नही, कंपनी काय करते? कंपनीचे भविष्याचे संकल्पना काय आहेत? तर असा व्यक्ती नक्कीच आपले पैसे गमवेल.

दूसरी कड़े असा व्यक्ती आहे जो एखादा कंपनीत इंवेस्ट करण्या अगोदर त्या कंपनीचे फंडामेंटल अनलीसीस करतो, कंपनी विषयी संपूर्ण माहिती करुण घेतो तर असा व्यक्ती नक्कीच शेअर मार्केट मधुन चांगले पैसे कमावतो.

शेअर बाजारात जर कोणी व्यक्ती अल्पकालीन वेळा पर्यंत पैशांची गुंतवणूक करत असेल तर तो व्यक्ती आपले पैसे गमावुन बसेल.

Stock market all time growth
Stock market all time growth

वरील फोटो आपन बघू शकता, शेअर मार्केट मधे खुप चढ उतार येत असतात पण अखेर मार्केट वरच जात असतो, म्हणून जो व्यक्ती बाजारात Long-Term Investing करतो तोच पैसे बनवतो.

खुप से व्यक्ती स्वतः मार्केट रिसर्च न करता, लोकांच्या टिप्स एकुन गुंतवणूक करतात हा एक कारण आहे ज्यामुळे लोक शेअर मार्केट मधे पैसे कमावण्यात असफल ठरतात.

स्टॉक मार्केट मधे डोळे बंद करुण जर इंवेस्टिंग करत असेल तर हा त्यांच्यासाठी रिस्की मार्केट आहे. मग हा स्टॉक बाजार नसुन सट्टा बाजार होतो तर दुसरी कडे अनेक उद्योगपती ह्यामध्ये गुंतवणूक करून करोडो रुपये कमवतात. कारण प्रत्येक व्यक्तीचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा वेगळा असतो.

स्टॉक मार्केट रिस्क कसा कमी करायचा | How To Reduce The Stock Market Risk

आपन वेग-वेगड्या पद्धातीचे इंवेस्टमेंट करत असतो, स्टॉक मार्केट मधे निवेश करतो, रियल इस्टेट मधे गुंतवणूक करतो, गोल्ड-बॉन्ड मधे इंवेस्ट करतो, NFT आणि क्रिप्टोकरन्सी मधे इंवेस्ट करतो मुख्यत: आपला उद्देश्य जास्त परतफेड (Return) मिडवने असतो.

पण ज्या प्रकारची आपली गुंतवणूक असते त्या प्रकारची जोखिम (Risk) असते. म्हणून प्रत्येक इंवेस्टमेंट सोबत Risk Manage करने आवश्यक असते.

पुढील 7 मुद्दे तुम्हाला स्टॉक मार्केट रिस्क व्यवस्थापित करण्यास मदत करतील.

1. जोखीम प्रोफाइलचे मूल्यांकन करा | Evaluate Risk Profile:

जी व्यक्ती आपल्या 20s मधे असतात त्यांचावर परिवाराची जबाबदारी (Responsibility) कमी असल्यामुळे ती जास्त प्रमाणात रिस्क घेऊ शकतात पण जी व्यक्ती आपल्या 40s-50s मधे आहे, ज्या व्यक्तीवर परिवाराची Responsibility आहे त्याचा रिस्क घेण्यची क्षमता फार कमी असते.

म्हणून जिथे आपण निवेश करत असतो त्याच्या विषयीचे आपले रिस्क किती आहे हे समजुन Risk Manage केला पाहिजे.

2. स्टॉक विविधीकरण | Stocks Diversification:

स्टॉक मार्केट मधे आपली सगळी गुंतवणूक कधीही एकाच कंपनीत न करता त्याला वेग-वेगडया ठिकानी इंवेस्ट करावे.

“Risk reduce by investing in portfolio of stock”

Harry Markowitz

जेव्हा आपन आपले संपूर्ण रकम एकाच स्टॉक्स मधे न गुंतवता त्याला अलग-अलग स्टॉक, कंपनीचे शेअर मधे, स्टॉक पोर्टफोलियो बनवतो तेव्हा आपला जो जोखिमेचा प्रमाण आहे तो कम होतो.

रिस्क दोन प्रकार चे असतात

Systematic risk: सिस्टमैटिक रिस्क होण्याचा कारण आहे Macro-Economics फैक्टर. म्हणजे असे रिस्क फैक्टर ज्याला आपन कंट्रोल करू शकत नाही, उदा. Russia-Ukarain War मुळे खुप स्या उद्योगावर प्रभाव पडत आहे.

Unsystematic risk: अनसीस्टमैटिक रिस्क म्हणजे स्टॉक संबधित रिस्क ज्याला आपण कंट्रोल करू शकतो. जसा आपण एकाच स्टॉक्स मधे इंवेस्ट न करता त्याला आपण पोर्टफोलियो डाईवरसीफाई करुण रिस्क कमी करू शकतो.

इंवेस्टिंगच्या सुरुवातीला आपले सर्व पैसे एक शेअर मधेच न लावता कमीत-कमी 8-9 वेग-वेगडया शेअर मधे लवावे.

3. मालमत्ता वाटप | Asset Allocation:

स्टॉक मार्केट मधे जर आपल्याला रिस्क कमी करायचा असेल तर तीसरा पॉइंट Asset Allocation. आपली सर्व रकम शेअर मार्केट मधे न घालता त्याला वेगड्या Asset मधे सुध्दा लावावे.

उदा. आपल्या 100 rs पैकी 50rs स्टॉक मधे तर 50 rs शेअर मधे. आपन शेअर मार्केट व्यतिरिक्त रियल इस्टेट, गोल्ड, NFT आणि क्रिप्टोकरेंसीत गुंतवणूक करू शकता.

4. रोख राखून ठेवा | Maintain Liquidity/Cash:

Share Market च्या Risk Management साठी आपली पुरेसी रकम बैंक, FD, Cash मधे Emergency साठी ठेवली पाहिजे. किंवा एखाद्या Crisis मुळे जेव्हा शेअर बाजारात Discount लागते तेव्हा तुमच्या कड़े Cash असने आवश्यक आहे.

5. दीर्घकालीन गुंतवणूक | Long-term investing:

शेअर मार्केट मधली महत्वाची Skill म्हणजे ती आहे धैर्य (Patience). मार्केट मधे शेअरचे किमती वाढने कमी होने हे चालत असते पण आपन मार्केटचे दीर्घकालीन दृश्य बघितले तर मार्केट नेहमी वर जात असतो. तर पाचवा पॉइंट ज्या मुळे शेयर मार्केट मधे रिस्क कमी होते तर ते आहे Long-term साठी investing करायची.

6. योग्य परिश्रम | Due Diligence:

आपल्या ला कित्येकदा ब्रोकर तर्फे, बतम्या आणि इतर लोकांकडून स्टॉकची Recomendation येत असतात पण त्या शिफारसीवर विश्वास ठेउन जर सोबत स्वतःच Research केले तर शेअर मार्केट मधे नफा होण्याचा प्रमाण कमी होतो.

7. आपले गुंतवणूक पहा | Watch Your Investment:

तुमची गुंतवणूक तुमच्या साठी Passive Income बनाउन देते पण पूर्णपने निष्क्रिय उत्पन्न (Passive Income) नसते कारण तुम्हाला वेळो-वेळी आपल्या गुंतवणूकीला मॉनिटर करने आवश्यक आहे. उदा. जर तुमची एखादी रियल इस्टेट प्रोपर्टी आहे पन ती प्रोपर्टी इनकम देत नसेल तर या वेडेस त्याला Manage करन्याची गरज असते.

टेक्निकल अनालिसिस काय असते | What Is Technical Analysis

इतिहासाच्या किंमतीच्या हालचालीद्वारे इतिहासाचे विश्लेषण आणि त्यांच्या भविष्याचा अंदाज लावने याला तांत्रिक विश्लेषण म्हणतात.

फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय | What Is Fundamental Analysis

फंडामेंटल अनालिसिस म्हणजे कंपनीचे Past बघून, अगोदर त्या कंपनीचा कशा प्रकारचा Performance होता, किती रिटर्न देले आहेत, प्रॉफिट किती आला, Sales किती आला, त्या कंपनीची History बघा आणि अनुमान लावा की Raju भविष्यात कसी कामगिरी राहिल या विश्लेषणास Fundamental Analysis असे म्हणतता.

उदा. समझा विराट कोहली न अगोदरच्या Mactches मधे उत्तम कामगिरी केली, बढ़िया Run बनवले तर आपल्याला यात एक लावता येते की विराट कोहली येणाऱ्या मैचेस मधे पण चांगली कामगिरी करेल.

फंडामेंटल अनालिसिस मधील महत्वाच्या बाबी:

Balance Sheet: कंपनीची संपूर्ण पिक्चर, जेव्हा पासून कंपनीची सुरुवात झाली आहे तेव्हा पासून चे आज पर्यंत कंपनी न किती नफा कमावल आहे, कंपनीकड़े किती रकम आहे हे आपल्या ला माहिती होते Balance Sheet मधुन.

Profit And Loss Statement: P&L मधे तुम्हाला त्या कंपनीने मागील 1 वर्षामध्ये किती रुपयाचे सामान विकले आणि त्यात कंपनीचा किती नफा (प्रॉफिट) झाला हे मुख्यत: तुम्हाला Profit And Loss Statement सांगते.

Cashflow: कंपनीचा Deeper analysis म्हणजे कंपनी ने प्रोडक्ट ची विक्री केली पण त्या विक्री ची रकम आली का? कंपनी कड़े Cash आहे पण तो आला कसा, कंपनी ने Cash कर्जा घेतले की स्वत: गोडा केले? या प्रकार ची Deeper Analysis कैशफ्लो द्वारे होतो.

ट्रेडिंग म्हणजे काय | What Is Trading In Stock Market In Marathi

नफा मिडवण्याच्या उद्देशाने वस्तु किंवा सेवेची केलेली खरीददारी म्हणजे ट्रेडिंग (Treding) होय. सोप्या शब्दात एखाद्या सामनाची खरेदी करुन ठेवने आणि जेव्हा त्या सामानाला कोणी जास्त किमत द्यायला तैयार असेल तर तो सामान विकने यालाच ट्रेडिंग (Trading) म्हणतात.

शेअर बाजारात दोन प्रकार चे व्यक्ती असतात. एक गुंतवणूकदार (Investor) तर दूसरा Trader. ट्रेडिंग हा शेअर बाजारामधला प्रचलित शब्द आहे.

जिथे एक गुंतवणूकदार (Investor) दीर्घकालावधिसाठी पैसे इंवेस्ट करतो तर ट्रेडर अल्पकालीन गुंतवणूक करतो.

शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग म्हणजे कमी किमतीत स्टॉक्स ची खरेदी करने आणि त्याला उच्च किमतीत विकने.

ट्रेडिंग चे प्रकार | Type Of Trading In Marathi

ट्रेडिंग चे मुख्यत: 4 प्रकार आहेत

1. इंट्रा-डे ट्रेडिंग (Intra-day Trading): एकाच दिवसामध्ये शेअरची खरेदी करने आणि त्याच दिवशि त्या शेअरला विकने म्हणजे इंट्रा-डे ट्रेडिंग होय.

2. स्कॅल्पर ट्रेडिंग (Scalper Trading): शेअर खरेदी केल्या पासून काही मिनिटात तो शेअर विकने म्हणजे स्कॅल्पर ट्रेडिंग ट्रेडिंग होय.

3. स्विंग ट्रेडिंग / शॉर्ट टर्म ट्रेडिंग (Short Term): जर तुम्ही शेअर खरेदी करुन काही आठवड्यांनी किंवा महिन्यांनी विकत असाल तर त्या ट्रेडिंग ला शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणतात.

4. लाँग टर्म ट्रेडिंग (long term trading): स्टॉक्स ची खरेदी करुन त्याला एक वर्षा पेक्षा जास्त दिवस होल्ड करून विकण्याला लाँग टर्म ट्रेडिंग असे म्हणतात. शेअर बाजारात जर नफा कमवायचे असेल तर लाँग टर्म ट्रेडिंग हा सर्वोत्तम मार्ग आहे.

ETF काय आहे | What Is ETF in Marathi

ETF चा फुल फॉर्म Exchange Traded Fund आहे. Exchange Traded Fund (ETF) हा इंडेक्स ला मागोवा करतो जसे Nifty हा इंडेक्स आहे ज्यात Top 50 Companies असतात, ETF हा शेअर सारखाच आहे यात गुंतवणूकदारा कडून पैसे गोडा करुन आणि इंडेक्स फंड मधल्या सर्वोत्तम प्रदर्शन करणार्या कंपनी मधे पैसे लवातात. पण ETF मध्ये गुंतवणूकीसाठी Demat Account ची गरज असते.

ETF कसे कार्य करते | How ETF Work

Exchange Treded Fund (ETF) जसा नवावरुन कडतो, ETF हा शेअर प्रमाने ट्रेड होतो म्हणजे ज्या प्रमाने कंपनीचे शेअरची खरेदी-विक्री होते त्याच प्रमाने ETF पण शेअर मार्केट मध्ये ट्रेड होतो.

ETF चे प्रकार | Type of ETF

Equity ETF: Equity म्हणजे शेअर, जेव्हा स्टॉक्स मधे ETF इंवेस्ट करते त्याला Equity ETF म्हणतात

Debt ETF: जेव्हा बॉन्ड मध्ये एखादी ETF इंवेस्ट करते त्याला Debt ETF असे म्हनतात.

Commodity ETF: Gold, Silver, Oil हा Commodity चे उदाहरण आहे. Commodity मध्ये ETF द्वारे गुंतवणूक करते त्याला Commodity ETF म्हणतात

ईटीएफ मध्ये गुंतवणूक का करावी | Why Invest in ETF

Low costs: ETF ची Cost 0.01% पासून शुरू होते जे की Mutual Fund च्या बरोबरित खुपच कमी आहे.

Bettar Returns : जर ETF Investment Cost कमी असेल तर Long-term मध्ये आपले गुंतवणूक परत फेड वाढण्याचे शक्यता असते.

Easy To Trade: ETF ची खरेदी-विक्री करने फर सोपे आहे.

ETF मध्ये निवेश कसा करायचा | How to invest in ETF

Check Expense Ratio: जेवढ कमी असेल तितक चांगल आहे

Tracking error: एखादा ETF कीती % टक्के Return देत आहे हे बघावे.

Liquidity: Daily Traded Volume कीती हे बघने आवश्यक आहे.

शेअर बाजारासाठी आवश्यक पाच मुद्दे

1. सिखा, ज्ञान अर्जित करा

शेअर मार्केटला जुआ, सट्टा बाजार म्हटले जाते कारण खुप से लोक येतात इथे पैसे बनवण्यासाठी पण ते यात आपले संपूर्ण पैसे Loss करतात आणि याला सट्टा बाजार म्हणुन कधी बघत नही.

शेअर बाजारात पैसे बनवता येतो पण जर व्यक्ती यात गुंतवणूक करण्याआधी कंपनी विषयीचा संशोधन केला, माहिती जमा केली, Knowledge घेतला तर स्टॉक मार्केट मधे पैसे कमावने अवघड नही.

मित्रानो, आपल्याला 20,000 नोकरी मिडवण्यासाठी कमीत-कमी आपले 15 वर्ष शिक्षणात देतो मग शेअर शेअर मार्केट चा शिक्षण न घेता आपण यात पैसे कसे कमाऊ शकतो.

तुम्ही शेअर मार्केट ला YouTube, Website, ब्लॉग, फोरम, स्टॉक मार्केट कोर्सेस मधुन शिकु शकता.

2. पेपर ट्रेडिंग

सुरुवातीला शेअर मार्केट ला सिखण्या साठी पेपर ट्रेडिंग करने फायदे च ठरू शकते. पेपर ट्रेडिंग मधे आपल्या खरया पैसा एवजी कल्पनिक पैसे दिले जाता त व शेअर पण का ल्प निक असतात. Paper Trading मुड़े आपल्या ला शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे अनुभव घेता येते

3. शेअर मार्केट टिप्स किंवा अफवांवर विश्वास करू नका

बहुतेकांची शेअर बाजाराची सुरुवात दुसर्यांचा टिप्स, सल्ला देलेला स्टॉक मधे गुंतवणूक करुण होते कारण की जेव्हा आपन या मार्केट मधे नवे असतो तेव्हा आपल्याला स्टॉक कसा निवडायचा, कंपनीची रिसर्च कसी करायची, अनालिसिस कसा करायचा यातलं आपल्या ला काही ही Knowledge नसतो म्हणून आपण दुसर्यांचा सल्लेवर इंवेस्टमेंट करतो.

पण दुसर्यांचा टिप्स अथवा अफवांवर विश्वास ठेवण्या आधी आपल्या कडून त्या कंपनी ची रिसर्च करने आवश्यक असते.

4. तुमची स्वत:ची भूमिका निश्चित करा

गुंतवणूकीच्या सुरुवातिला आपली भूमिका म्हणजे आपण Investor आहो की Trader हे निश्चित करने गरजेच असते.

Investor हे कंपनिचा सखोल अभ्यास करुण दीर्घ-कालावधिसाठी स्टॉक्स मधे गुंतवणूक करतात आणि Trader हे काही दिवसांसाठी शेअर मधे गुंतवणूक करतात.

शेअर मार्केट चे गुरु Warren Buffett यानी आपली सुरुवात Investor म्हणून केली. जर तुम्हाला स्टॉक मार्केट मधे यशस्वी व्हायचा असेल तर इंवेस्टर म्हणून आपले पैसे Long-term साठी इंवेस्ट करयच कारण की Compound Effect हा Long-term मध्येच दिसतो

5. संयम ठेवा

लोकांना स्टॉक बाजार म्हणजे झटपट पैसे मिळवण्याचे साधन वाटते आणि असेच व्यक्ती आपली नुकसान करुण बसतात. शेअर मार्केट मध्ये पैसे बनवण्या साठी आणि Compound effect ची जादू दिसन्यासाठी खुप वेळ लागतो. जर आपल्यात संयम नसेल तर आपल्याला यात पैसे गमावन्यास काही वेळ लागनार नाही.

वारेन बुफेट्टची संपत्ति बनन्यासाठी 50 वर्षा पेक्षा जास्त कालावधि लागला हणुन संयम ठेवने आवश्यक आहे.

शेअर बाजाराची मराठी पुस्तकं | Share Market Books For Investing

शेअर बाजार शिकन्या साठी उपयुक्त ठरू शकनारी पुस्तकं

1 The Intelligent Investor
लेखक: बेंजामिन ग्राहम

2 Once Upon On Wall Stree
लेखक: पीटर लिंच

3 Dhandho Investor
लेखक: मोनिश पाब्रॉय

4 Learn and Earn लेखक: पीटर लिंच

FAQs

 1. स्टॉक मार्केट काय असते?

  ज्या ठिकानी कंपनीच्या स्टॉक्स, शेअर ची खरेदी-विक्री केल्या जाते असे मार्केट ला स्टॉक मार्केट. एखाद्या कंपनी, बिजनेसचे शेअर तुम्हाला त्यात भागीदारी देण्यास सहायक ठरतात.

 2. SIP म्हणजे काय?

  SIP चा Full Form आहे Systematic Investment Planing. पद्धतशीर गुंतवणूक योजना.

 3. ETF म्हणजे काय?

  ETF चा फुल फॉर्म आहे Exchange Traded Fund. ETF हा शेयर प्रमानेच ज्याची Exchange मधे गुंतवणूकदारा द्वारे खरेदी-विक्री केली जाते.

 4. IPO म्हणजे काय?

  जेव्हा कंपनी पहल्यांदा इतर लोकांना आपल्या कंपनीत भागीदार होण्याची संधी देते त्यालाच IPO असे म्हणतात.IPO चा Full Form Initial Public Offering (प्रारंभिक सार्वजनिक ऑफर). IPO द्वारे कंपनी लोकांकडून मोठ्या प्रमाणात रकम गोडा करुण त्याला कंपनीच्या वाढी साठी लावतात.

 5. ट्रेडिंग चे किती प्रकार आहेत?

  ट्रेडिंग चे मुख्यत: 4 प्रकार आहेत
  1 इंट्रा-डे ट्रेडिंग (Intra-day Trading): एका दिवसात पूर्ण झालेल्या ट्रेडिंगला इंट्रा-डे ट्रेडिंग असे म्हणतात.
  2 स्कॅल्पर ट्रेडिंग (Scalper Trading): खरेदी केल्याच्या काही मिनिटांतच विकल्या गेलेल्या ट्रेड्स ना स्कॅल्पर ट्रेडिंग म्हणतात.
  3 स्विंग ट्रेडिंग / शॉर्ट टर्म ट्रेडिंग(Short Term): या ट्रेडिंगमध्ये शेयर काही दिवसात, काही आठवड्यात तर महिन्यात विकल्या जाते.
  4 लाँग टर्म ट्रेडिंग (long term trading): लांबअवधिसाठी (एका वर्षा पेक्षा जास्त) शेअर ला राखुन विकल्या जातो त्याला लाँग टर्म ट्रेडिंग म्हणतात.

 6. भारतातील स्टॉक एक्सचेंज कंपनी कोणती आहे?

  भारता दोन स्टॉक एक्सचेंज कंपनी आहेत BSE आणि NSEभारतातील स्टॉकच्या खरेदी-विक्री साठी मुंबईतील Bombey Stock Exchange (BSE) ची सुरुवात 1875 मध्ये भारताची पहिली स्टॉक एक्सचेंज म्हणून झाली.भारताचा दुसरा सर्वात मोठा स्टोक एक्सचेंज NSE (National Stock Exchange) ची स्थापना 1992 मध्ये झाली.

 7. शेअर मार्केट मधून पैसे कसे कमवायचे?

  • बाजारात गुंतवणूक करण्याआधी त्या कंपनी विषयीची सगड़ी माहिती असने आवश्यक आहे.
  • मार्केट नेहमी वर जात असतो म्हणून दीर्घकालीन गुंतवणूक (Long Term Investment) केली पाहिजे.
  • आपली जोखिम घेण्याचा क्षमतेपेक्षा जास्त पैसा बाजारातगुंतवू नये.
  • दुसर्यांचा सल्लेवर विश्वास ठेऊन कंपनीत इंवेस्ट करण्याआधी स्वतःकडून एकदा Resarch करायला हवे.

Conclusion:

Share Market ला लोक जोखिमेच खेळ मानतात आणि या विषयची जसी लोकांची धारना बनली आहे कि हा एक जुआ आहे पण Share Market नाही जुआ आहे, नाही जोखिमेच खेळ आहे हा तर आपण कसे पहात आहात यावर अवलंबून आहे, तुमचा दृष्टिकोन कसा आहे.

एखाद्या कामाची सुरुवात करण्या अगोदर आपल्याला त्या कामाची माहिती असने आवश्यक आहे त्याच्य प्रकारे Stock Market मधे Stock कसा नीवडायचा याचा ज्ञान असने जरूरी असते.

जर आपल्याला Share Market मधे यशस्वी व्हायचे असेल तर सर्व प्रथम आपल्याला आपली Knowledge वाढवने, आपलं ज्ञान अर्जित करने गरजेचे आहे.

Warren Buffett ज्यांना Share Market चा Guru मानतात त्यानी सूचवलेल शेअर मार्केटच पुस्तक आहे “The Intelligent Investor” नक्की वाचा.

तुमची फेवरेट स्टॉक मार्केट बुक कोणती आहे, आम्हाला Comment द्वारे कड़वा.

हे सुद्धा वाचा:

1. Mutual Fund काय आहे?

2. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी?

3. IPO मध्ये गुंतवणूक कशी करावी?

Leave a Comment

%d bloggers like this: